शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (09:59 IST)

पुण्यात 12 ऑक्टोबरपासून महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था पुन्हा सुरू होणार आहेत

पुण्यात राज्य प्रशासनाच्या आदेशानुसार आज म्हणजे 12 ऑक्टोबर पासून महाविद्यालये, कोचिंग संस्थान,सुरु होणार आहे. पुणे महानगर पालिकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सुरु होणाऱ्या वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी असेल.तेच विद्यार्थी आणि कर्मचारी महाविद्यालयात येऊ शकतात ज्यांनी कोविडविरोधी दोन्ही लसी घेतल्या आहेत.पुण्यातून बाहेरच्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर(RTPCR)चा अहवाल सादर करावा लागणार.पुण्यात आजपासूनच पर्यटन स्थळे आणि नाट्यगृह देखील सुरु होत आहे. 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता संपूर्ण देशात लॉक डाऊन लावण्यात आले होते.त्यामुळे देशातील सर्व महाविद्यालये,  शाळा, कार्यालय, बंद होते. आता हळू  हळू  कोरोनाचा प्रभाव मंदावला आहे. ते बघता राज्य सरकार ने पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी आज पासून होणार असून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये आणि कोचिंग संस्थान तसेच पर्यटन स्थळे देखील सुरु होणार आहे. उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की आज पासून खासगी कार्यालयात देखील 100 टक्के उपस्थतीची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल देखील आता 11 वाजे पर्यंत सुरु राहतील.तसेच नाट्यगृहात देखील 50 टक्केच्या क्षमतेने लोक येऊ शकतात.