1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (11:05 IST)

पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा निर्णय,जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेशधिकारी अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात

पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा निर्णय़ घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. बाईक चालवणाऱ्यांचे सर्वाधिक अपघात होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
पुण्यात ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. 1 तारखेपासून हे आदेश लागू होणार आहेत. कारच्या तुलनेत बाईक चालकांचा अपघातात डोक्याला मार मागून मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला  आहे .
 
सर्व सरकारी अधिकारी  आणि कर्मचारी यांना कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेटआवश्यक असणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशारा ही देण्य़ात आला आहे.