गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (11:01 IST)

पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

narendra modi
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते, पण पावसामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 22 हजार 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज पुण्यात पोहोचणार होते, ज्यामध्ये मेट्रो ट्रेनच्या उद्घाटनासह अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आणि परम रुद्र सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन यासह पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार होते. आता पंतप्रधान पुण्याला जाणार नसल्यामुळे हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे, पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Edited By- Dhanashri Naik