गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (11:25 IST)

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

leopard
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तसेच वंश राजकुमार सिंग असे या चिमुरड्याचे नाव आहे. मांडवगण फराटा गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. एका अधिकारींनी रविवारी ही माहिती दिली.
 
तसेच वन विभागाच्या एका अधिकारींनी सांगितले की, वंशचे आई-वडील मूळचे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील असून ते शिरूर तालुक्यातील गुळ उत्पादन युनिटमध्ये काम करण्यासाठी आले होते. तर शुक्रवारी रात्री वंश घरातून निघून गेला. तो उसाच्या शेताकडे गेला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. व त्यामध्ये या चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे. या घटनेची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना दिली आहे.

Edited By- Dhanashri Naik