रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:20 IST)

पुणे : मीडिया हाउसमध्ये पैसे गुंतविण्याच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक, आरोपीला अटक

arrest
पुणे  : गुंतवणूकदारांनी प्रिंटिंग प्रेस आणि मीडिया हाउसमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने व्यावसायिकाची तब्बल दोन कोटी चार लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
अपर्णा अशोक गिरी (रा. श्रीमंत अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमचंद पितांबर भोळे (रा. प्राधीकरण चिंचवड,पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. ही घटना ऑगस्ट 2018 ते एप्रिल 2023 कालावधीत मार्केटयार्डत घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रेमचंद भोळे आणि अपर्णा गिरी यांची 2018 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने प्रेमचंद यांना प्रिंटिंग प्रेस आणि मीडियाची माहिती देत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार प्रेमचंद यांनी 2 कोटी 49 लाख रुपये व्यवसायात गुंतविले. काही महिने अपर्णाने त्यांना व्यवसायातील नफा मिळाल्याचे सांगत थोडे थोडे असे मिळून 44 लाख 90 हजार रुपये माघारी दिले. मात्र, उरलेल्या 2 कोटी 4 लाख 10 हजारांबाबत विचारणा केली असता, तिने पैसे देण्यास टाळाटाळ करीत आर्थिक फसवणूक केली. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor