गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (17:25 IST)

पुण्यातील 10 वर्षांच्या चिमुकलीने वाचविला आजीचा जीव

महाराष्ट्रातील पुण्यात चेन स्नॅचिंगच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. एका स्कूटीस्वाराने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. पण वृद्ध महिला आणि त्यांच्या नातीच्या धाडसामुळे तो साखळी हिसकावू शकला नाही.
 
पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीतील घटना आहे. मात्र एका धक्क्यात ती महिला रस्त्यावर पडली, त्यामुळे तिला किरकोळ दुखापत झाली.
 
महिला आपल्या नातवंडांसह घरी जात होती, तेवढ्यात ही घटना घडली. बुधवारी रात्री आठच्या सुमारास 60 वर्षीय लता घाग या आपल्या दोन नातवंडांकडे घरी परतत होत्या. यादरम्यान एक स्कूटी स्वार त्यांच्याजवळ येतो आणि पत्ता विचारू लागतो. महिला तरुणाच्या जवळ येताच त्याने धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला.
 
आजीला अडचणीत पाहून चिमुकलीने आरोपीवर हल्ला केला. मात्र आरोपी पळून गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.