गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (08:53 IST)

पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी

pune mahapalika
पुणे :पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
मिळकत करातील ४० टक्के सवलत १ ऑगस्ट २०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्के हून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत.
 
या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४० टक्के सवलत आणि १५ टक्केहून १० टक्के देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे ही सवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.
Edited by : Ratnadeep Ranshoor