शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (13:10 IST)

पुण्यातील उद्याने बंद करण्याचा निर्णय

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू केलेली उद्यानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनलॉकमध्ये येथील 33 उद्यानं सुरू केली होती.
 
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते आणि बागेत अनेक साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच मास्क घालून व्यायाम करणे आरोग्यासाठी फायद्याचे नाही आणि मास्कविना गर्दी करणे योग्य नाही. 
 
उद्याने सुरू झाल्यानंतर सुरक्षाकर्मी, माळी आणि इतर कामाला लोक येथे लावल्यावर यंत्रणेवर ताण वाढेल. अर्थात कोरोनासाठी लावलेल्या मनुष्यबळ यंत्रणेवर ताण पडेल.
 
ही अत्यावश्यक गरज नसल्यामुळे याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुले आहेत, त्यामुळे उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही, भविष्य काळात त्याचा विचार करू असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.
 
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 इतकी आहे. आतापर्यंत 481 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण 6713 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.