शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (17:18 IST)

Pune : पुण्यात महिलेने तीन मुलीनंतर दिला तिळ्यांना जन्म

Pune : उत्तर प्रदेशातील एक महिला काही वर्षांपासून पुण्यात राहत आहे. या महिलेने एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला असून महिला आणि तिन्ही बाळ सुखरूप आहे. बाळांमध्ये  दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या पूर्वी महिलेला तीन मुली आहे. आता महिलेने पुन्हा तिळ्यांना जन्म दिला आहे. मुख्य म्हणजे महिलेने साडे आठ महिन्यात बाळांना जन्म दिला. महिलेला घरातच प्रसूतीकळा सुरु झाल्या असून महिलेने घरीच एका बाळाला जन्म दिला. 
 
घरी जन्मलेल्या बाळाला श्वास घेण्यास बाळाला त्रास होऊ लागला .महिलेला 22 ऑगस्ट रोजी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिने सायंकाळी 7:50 वाजता दुसऱ्या मुलीला आणि त्याच्या पाठोपाठ 7:56 वाजता तिसऱ्या मुलीला जन्म दिला. 
 
तिन्ही बाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळांना ऑक्सिजन आणि सलाईन देण्यात आले आहे. आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून लवकरच त्यांना सोडण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 
 
Edited by - Priya Dixit