शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:43 IST)

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

pankaja munde
दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
 
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या विवाह सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेऊन श्री.मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
 
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दीपिका शेरखाने यांसह मान्यवर उपस्थित होते.
 
स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो असे म्हणत धनंजय मुंडे व राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.