बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (19:59 IST)

कामगाराचा डोक्यात दगड घालून खून, मारेकरी फरार

कंपनीतून सुटल्यावर परत जाताना कामगाराला मारहाण करून डोक्यात दगड घालून   खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री पुण्याच्या चिखली येथे घडली आहे. सुनील शिवाजी सगर(35) असे या खून झालेल्या मयत कामगाराचे नाव आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील एका खासगी कंपनीत कामाला होते. ते  कंपनीत काम करण्याव्यतिरिक्त गोठ्याच्या साफ सफाईचे काम देखील करायचे. शुक्रवारी कंपनीतून सुटल्यावर जाधववाडी येथून ते पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना थांबवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक आपल्यावर झालेल्या हल्ल्यांनंतर त्यांनी आपल्याला वाचविण्यासाठी एका दुकानात शिरले आणि लपायचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांना खेचून बाहेर काढून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन सुनील यांच्या मारेकरीला शोधत आहे.