1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:38 IST)

विनापरवाना गाळप केलेल्या 9 साखर कारखान्यांना साखर कोटींचा ठोठावला दंड

पुणे : विनापरवानगी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे राज्यातील 9 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारवाई केली आहे. या सर्व कारखान्यांना मिळून ब्बल 38 कोटी 17 लाख 31 हजार 500 रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या साखर कारखान्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या कारखान्यांचा समावेश आहे.
 
गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना अर्ज करून साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घ्यावा लागतो, त्याशिवाय साखर कारखाने सुरू केल्यास कारखान्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. विनापरवाना गाळप केलेल्या उसाला साखर आयुक्त प्रतिटन 500 रुपये दंड आकारणी करू शकतात.
 
दरम्यान, विनापरवाना गाळप केलेल्या 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी दंड ठोठावला असून या 9 कारखान्यांना तब्बल 38 कोटी 17 लाख 31 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या नऊ कारखान्यांपैकी चार पुण्यातील, दोन सांगली, एक सातारा आणि दोन सोलापूरमधील आहेत. यातील सात कारखाने सहकारी तर दोन खासगी यांचा समावेश आहे. सर्वाधिक साडे सात कोटी दंड ठोठावलेला साखर कारखाना सांगलीच्या राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचं देखील कारखाना आहे.