शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (09:31 IST)

'माय सेफ पुणे' अ‍ॅपचे लोकार्पण, त्वरीत पोलीस मदत मिळणार

'माय सेफ पुणे' अ‍ॅपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आता शहरातील गंभीर गुन्हे किंवा एखाद्या भागात अपघात घडल्यास घटनास्थळाचे छायाचित्र नागरिकांनी पुणे पोलिसांनी तयार केलेल्या पाठविल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध होणार आहे. 
 
एखाद्या ठिकाणी दुर्घटना किंवा गंभीर गुन्हा घडल्यास त्याचे छायाचित्र माय सेफ पुणे अ‍ॅपवर टाकल्यास त्वरीत मदत उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून गस्त (बीटमार्शल) घालण्यात येते. त्यासाठी या अॅपचा चांगला फायदा होईल. 
 
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अ‍ॅपचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शहर पोलीस दलातील परिमंडळ चारच्या अखत्यारीतील भागात उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील घटनांचे छायाचित्र या अ‍ॅपवर टाकल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गस्त घालणार्‍या पोलिसांनी घटनास्थळाचा पत्ता पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.