1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Pune Worker brutally beaten up for demanding salary case registered

Pune : पगार मागितल्यावरून कामगाराला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

पगार मागितल्यावरून कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील शिवाजी नगर च्या मॉडेल कॉलनी परिसरात घडली आहे.या मारहाणीत जखमी कामगाराचा मृत्यू झाला आहे. अविनाश भिडे(वय वर्ष 36) रा.बेनकर वस्ती, धायरी असे या मयत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात कामगाराच्या पत्नीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद केली असून पोलिसांनी 13 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 
 
सदर घटना शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे घडली. मयत भिडे हे शेखर जोगळेकर यांच्या ऑफिसात मशीन ऑपरेटर होते. पगारावरून भिडे आणि जोगळेकर यांच्यात बाचाबाची झाली. या पूर्वी देखील पगारावरून भिडे आणि जोगळेकर यांच्यात वाद झाला होता त्यात जोगळेकरने 1 सप्टेंबर रोजी भिडे यांना ऑफिसातून हाकलले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. 

 या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली. नंतर भिडे यांच्या पत्नीने पोलिसांत धाव घेत आरोपी जोगळेकर आणि इतर 13 जणांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. त्या नंतर पोलिसांनी आरोपी जोगळेकर आणि 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 







Edited by - Priya Dixit   
 
पुढील लेख
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड