शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (11:45 IST)

Road Accident :भरधाव जीपची धडक लागून मुलाचा मृत्यू

भरधाव जीपची धडक लागून पुण्यात दुचारीवरील दोन वर्षाच्या मुलाचा दुर्देवी अंत झाला .श्रेयस युवराज कोकणे असे मयत मुलाचे नाव आहे . ही दुर्देवी घटना नगर रोड वर घडली. मयत श्रेयस आपल्या अल्पवयीन आतेभाऊ आणि त्याच्या मित्रासह दुचाकीवरून सूर्यवंशी नगर रस्त्यावरून जात असताना वाघोलीजवळ एक भरधाव वेगाने येणाऱ्या जीपची धडक बसली.  त्यात श्रेयसच्या आतेभाऊ आणि मधोमध बसलेला श्रेयस वेगाने फेकले गेले .या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या श्रेयसच्या उपचारापूर्वीच अंत झाला. या अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र जखमी झाले आहे. धडक दिल्यावर जीप चालक पळून गेला. जीप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे .