सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (10:11 IST)

Facebook Live करत वेटरची आत्महत्या

पुणे- एक धक्कादायक घटनेत एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे आहे. 26 वर्षीय अरविंद आत्महत्येपूर्वी Facebook Live केलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.
 
एक महिन्यापूर्वीच अरविंद मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंदने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला. यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे.  अरविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
 
ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अरविंद याने आत्महत्येपूर्वी फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधीलच काही कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला. मग इमारतीच्या 13व्या मजल्यावरुनउडी घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.