सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (21:33 IST)

नवविवाहित महिलेवर संशय, करायाला लावली कौमार्य चाचणी, पोलीसात गुन्हा दाखल

पुण्यात लग्न झाल्यानंतर नवविवाहित महिलेच्या नवऱ्याने तिच्यावरती संशय घेऊन तिला कौमार्य चाचणी म्हणजेच वर्जिनिटी टेस्ट करायला लावली. ते एवढ्यावरच न थांबता या महिलेला मुलं झालं आणि ती मुलगी असल्या कारणामुळे तिचा छळ करुन माहेरी पाठवण्यात आले. त्यानंतर  या २५ वर्षिय विवाहित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार  नोंदवली आहे. त्यावरुन पोलिसांना पती आकाश शिंदे (वय २६, रा. ठाणे) याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळं प्रकरण 2017 ते जानेवारी 2021 दरम्यान घडलं आहे. या महिलेच्या नवऱ्याने लग्न झाल्यापासून बऱ्याचदा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि कौमार्य चाचणी केली. तसेच या महिलेला मुलगी झाली म्हणून तिला मानसिक आणि शरीरीक त्रास दिला गेला. तिला घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले गेले.
 
या महिलेचा पती आकाश हा दारु पिऊन शिवीगाळ करुन तिला मारहाण करत असे. तसेच तिला जानेवारीमध्ये माहेरी पाठवून दिले. त्यानंतर महिलेला घरी नवऱ्याने घेतले नाही. ही महिला जबरदस्ती जेव्हा तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की, तिच्या नवऱ्याने आपले घर बदलले आहे. तसेच त्याच्या घरच्यांनी तिचे फोन घेण्यासाठी देखील टाळाटाळ केली. ज्यामुळे शेवटी या महिलेला पोलिसांकडे धाव घेत  मानसिक आणि शारिरीक छळाची तक्रार पोलिसात दिली.