वाघोलीत चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
पुण्यातील वाघोलीत बाएफ रोड वरील मुळीक सोसायटी समोर सकाळी 8 वाजेच्या सुमारास इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून गिरणीतनेले आणि तिच्यावर अतिप्रसंगकेला
मुलगी घरून शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत अडवले आणि तुला खाऊ देतो असे म्हणत पिठाच्या गिरणीत नेले आणि लैंगिक अत्याचार केले.
काही वेळाने पीडित मुलगी गिरणीतून बाहेर आली आणि रडू लागली. हे पाहून परिसरातील नागरिकांनी तिच्या जवळ येऊन तिची विचारणा केल्यावर तिने गिरणीवाल्या अंकलने माझ्यासोबत असे केले. असे सांगितल्यावर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपी गिरणी कामगाराला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासह राहते. ती दररोज त्या रस्त्यानेशाळेत जाण्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
घडलेल्या घटनेमुळे वाघोली परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाघोली पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध लैंगिक गुन्हे प्रतिबंधात्मक कायदा पॉक्सो एक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहे.
Edited By - Priya Dixit