तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्या भरात वडिलांचा खून
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघड झाला. तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात स्वतःच्या वडिलांचा चाकू भोसकून खून केला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. दस्तगीर (वय 38) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मृत दस्तगीर हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्या मुलात आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून दस्तगीर यांनी या मुलाला हाताने मारहाण केली होती. याच रागातून संबंधित मुलाने घरातील चाकूने वडिलांच्या पोटावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दस्तगीर यांचा मृत्यू झाला.