गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (21:34 IST)

‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस रविवारी शहरातील ‘या’ केंद्रांवर मिळणार

पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा डोस 8 केंद्रावर दिला जाणार असून एका केंद्रांवर 150 जणांना लस दिली जाणार आहे. तर, कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस 33 केंद्रांवर दिला जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे.
 
‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवस झालेल्यांना देण्यात येणार आहे. तर, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.
 
या आठ केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस !
 
यमुनानगर रुग्णालय,तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि कासारवाडी दवाखाना या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचा दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस या 33 केंद्रांवर मिळणार लस !
साई आंब्रेला संभाजीनगर, घरकुल दवाखाना चिखली, रुपीनगर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, नेहरूनगर उर्दू शाळा, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, महापालिका शाळा बोपखेल, नवीन भोसरी रुग्णालय,सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी,
 
पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिवंसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे