मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (13:51 IST)

वेदिकाची अखेरची पोस्ट

स्पायनल मस्क्युलर अट्रोफी(SMA) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत 11 महिन्याच्या चिमुकली वेदिकाचं रविवारी (1ऑगस्ट)रोजी निधन झालं.वेदिका ला SMA नावाचा दुर्मिळ आजार होता.या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक असलेलं तब्बल 16 कोटींचं इंजक्शन तिला देण्यात आले होते.या इंजेक्शन मुळे तिच्या तब्बेतीत सुधारणा होत होती.परंतु रविवारी तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.आणि ती हे जग कायमचे सोडून गेली.तिला 15 जून रोजी अमेरिकेतून 16 कोटीचे मागवलेले इंजेक्शन दिले होते.या इंजेक्शनसाठी आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केलं होत.   
 
वेदिकाची अखेरची पोस्ट 
"आज माझ्या वडिलांनी मला एक बॉल दिला आणि मला तो घट्ट पकडण्यात यश आलं. हे आश्चर्यकारक नाही का? आता आपल्या सर्वांसोबत खेळण्याची मी वाट पाहत आहे. माझी आजी माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझ्यासाठी अंगाई गीत गाते आणि मी टाळ्या वाजवते.आता मी टाळी वाजवू शकते."
 
सध्या मी स्टिरॉइड्सवर आहे. आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तुमच्या प्रार्थनांचे आभार. डॉक्टर म्हणतात थोडी सुधारणा दिसून येत आहे. डॉक्टरांनी रक्त आणि यकृत चाचण्या कमी केल्या आहेत. पण बदलत्या हवामानामुळे कमी ऑक्सिजन पातळी,माझ्या श्वासावर खूप परिणाम करत आहे.मला सतत ताप येतोय आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे आई बाबा काळजीत आहेत. ते मला उद्या न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाणार आहेत.
 
पण वेदिका कधीही हार मानत नाही.माझी फिजिओथेरपी सुरू होणार आहे. दररोज होणाऱ्या वेदना मला रडवतात.आता फीड टाइम आहे आणि मला जायचं आहे. मी अजूनही खाऊ शकत नाही, पण आपण सर्वानी दिलेल्या प्रेमामुळे माझं पोट भरत आहे."