शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (17:04 IST)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळ पोत्यांमध्ये भरलेला महिलेचा मृतदेह आढळला

crime news
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे जवळ एका महिलेचा दोन पोत्यांमध्ये फेकलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. या महिलेचे वय 30 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्सप्रेस वे जवळ एका महिलेचा मृतदेह फोन पोत्यांमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

हा मृतदेह शिरगाव फाटा परिसरात साफ स्वच्छता करणाऱ्या कामगारांना सोमवारी दुपारी आढळला. त्यांनी सदर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. महिलेची हत्या दोन दिवसांपूर्वी झालेली असावी कारण मृतदेह कुजू लागला. 

पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटविणाचे काम सुरु असून लोकांची मदत घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit