Dhaba Style अमृतसरी छोले भटुरे रेसिपी
पंजाबी जेवण त्याच्या उत्कृष्ट चव, सुवासिक मसाले आणि रिच ग्रेव्हीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच तुम्हाला घरीच अस्सल ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंटसारखे पंजाबी अमृतसरी छोले भटुरे बनवायचे चला जाणून घेऊ या....
अमृतसरी छोले भटुरे रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा वीकेंडच्या बेतासाठी छोले भटुरे हा उत्तम पर्याय आहे.
छोले रेसिपी-
साहित्य: रात्रभर भिजवलेले काबुली चणे (छोले), कांदा-टोमॅटोची पेस्ट, चहापत्तीची पुरचुंडी (काळ्या रंगासाठी), छोले मसाला, आले-लसूण पेस्ट, तमालपत्र, जिरे.
कृती- कुकरमध्ये भिजवलेले छोले, पाणी, मीठ आणि चहापत्तीची पुरचुंडी टाकून ४-५ शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्या. (नंतर चहाची पुरचुंडी काढून टाका). कढईत तेल गरम करून जिरे आणि तमालपत्राची फोडणी द्या. मग कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट, हळद आणि २ चमचे 'छोले मसाला' टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परता. आता शिजवलेले छोले पाण्यासह त्यात टाका आणि थोडे मॅश करा जेणेकरून ग्रेव्ही दाट होईल. १०-१२ मिनिटे उकळू द्या.
भटुरे रेसिपी-
साहित्य: मैदा (२ कप), दही (अर्धा कप), बेकिंग सोडा (पाव चमचा), सूजी/रवा (२ चमचे), तेल, मीठ.
कृती: मैद्यात रवा, दही, बेकिंग सोडा, मीठ आणि थोडे तेल घालून कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ २ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवा. नंतर त्याचे जाडसर भटुरे लाटून कडकडीत तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
अमृतसरी छोले भटुरे रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा वीकेंडच्या बेतासाठी छोले भटुरे हा उत्तम पर्याय आहे.
छोले रेसिपी-
साहित्य: रात्रभर भिजवलेले काबुली चणे (छोले), कांदा-टोमॅटोची पेस्ट, चहापत्तीची पुरचुंडी (काळ्या रंगासाठी), छोले मसाला, आले-लसूण पेस्ट, तमालपत्र, जिरे.
कृती- कुकरमध्ये भिजवलेले छोले, पाणी, मीठ आणि चहापत्तीची पुरचुंडी टाकून ४-५ शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्या. (नंतर चहाची पुरचुंडी काढून टाका). कढईत तेल गरम करून जिरे आणि तमालपत्राची फोडणी द्या. मग कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट, हळद आणि २ चमचे 'छोले मसाला' टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परता. आता शिजवलेले छोले पाण्यासह त्यात टाका आणि थोडे मॅश करा जेणेकरून ग्रेव्ही दाट होईल. १०-१२ मिनिटे उकळू द्या.
साहित्य: मैदा (२ कप), दही (अर्धा कप), बेकिंग सोडा (पाव चमचा), सूजी/रवा (२ चमचे), तेल, मीठ.
कृती: मैद्यात रवा, दही, बेकिंग सोडा, मीठ आणि थोडे तेल घालून कोमट पाण्याने मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ २ तास ओल्या कपड्याने झाकून ठेवा. नंतर त्याचे जाडसर भटुरे लाटून कडकडीत तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
ALSO READ: सर्वांना आवडणारा पदार्थ पंजाबी आलू कुलचा
तर चला तयार आहे आपले अस्सल ढाबा स्टाईल अमृतसरी छोले भटुरे रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik