चंद्र पाहण्याचे काय महत्त्व, जाणून घ्या
सध्या रमजानचा पाक महिना सुरू आहे. ज्या दिवशी रमजानचा पाक महिना संपतो त्याच्या दुसर्या दिवशी ईद-उल-फितर सण साजरा केला जातो. याला मीठी ईद असेही म्हणतात. ईद-उल-फितरचा सण इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजाननंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. ईद-उल-फितरच्या निमित्ताने मशिदी सजवल्या जातात. लोक नवीन कपडे घालतात, नमाज वाचतात, एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. घरात गोड पक्कवान विशेष म्हणजे शेवयांची खीर तयार केली जाते.
चंद्रमाचे महत्त्व
वास्तविक इस्लामिक दिनदर्शिका चंद्रावर आधारित आहे. ईद किंवा प्रमुख सण फक्त चंद्र दिसेल तेव्हाच साजरे केले जातात. रमजानचा पवित्र महिना चंद्र पाहण्यापासून सुरू होतो आणि चंद्रमाच्या आगमनानंतर संपतो. रमजान 29 किंवा 30 दिवसांनंतर ईदचा चंद्र दिसतो.
ईदचे महत्त्व
मान्यतेनुसार पैगंबर मुहम्मद साहब यांच्या नेतृत्वाखाली जंग-ए-बद्रमध्ये मुस्लिम जिंकले होते. विजयाच्या आनंदात लोकांनी ईद साजरी केली होती आणि घरांमध्ये मिठाष्न तयार केले होते. याप्रकारे ईद-उल-फितर याचे प्रारंभ जंग-ए-बद्र पासून सुरु झाले.
ईद-उल-फितरच्या दिवशी लोक अल्लाहचे आभार मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या कृपेमुळेच संपूर्ण ते महिनाभर रमजानसाठी उपवास ठेवण्यास सक्षम असतात. या दिवशी लोक आपल्या उत्पन्नातील काही भाग गरीब लोकांमध्ये वाटतात. त्यांना भेट म्हणून कपडे, मिठाई, भोजन इतर दान करतात.