बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|

टाटांचे पोलाद मंदीतही मजबूत

जागतिक आर्थिक संकट जगभरातील जवळपास सर्वच कंपन्यांना भेडसावत आहे. या काळात कंपन्यांमध्ये उत्पादन कमी झाल्याने कर्मचारी कपात करण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. अशातच पोलाद निर्मितीत महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलला मात्र मंदीच्या काळात चांग लाच फायदा झाला आहे.

या काळात कंपनीने आपल्या उत्पन्नात वाढ झाल्याचे स्पष्ट केले असून, नफा 1400 कोटीने वाढल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर कंपनी जगातील प्रमुख सहा कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

कंपनीने आज अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीने नोव्हेंबर दरम्यान 578400 टन हॉट मेटल आणि 513789 टन क्रूड स्टील तयार केले. गेलयावर्षीच्या मानाने यात 26 आणि 23 टक्क्यांची वाढ झाली आहे.