शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:25 IST)

अॅट्रॉसिटी अंतर्गत शरद पवारांविरोधात गुन्हा नोंदवा!

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी मागणी नांदेडमधील दलित तरुणांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. मात्र जनतेच्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे,  असंही पवार म्हणाले.कोपर्डी बलात्काराविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चा निघत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक मोर्चात लाखो लोग सहभागी झालेत, त्यामुळं मी एवढंच म्हटलं होतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटत असेल, तर त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं. माझ्या माहितीनुसार दोन मागण्या होत्या, एक मराठा समाजाला आरक्षण आणि दुसरी अॅट्रॉसिटीबाबात होती. पण मी अॅट्रॉसिटी रद्द व्हावा असं म्हटलं नाही, असं शरद पवार म्हणाले.

पवार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी मागणी नांदेडमधील दलित तरुणांनी केली आहे. या तरुणांनी पोलिस उपअधीक्षकांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.