शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (10:31 IST)

आणखीन चार ऍडमिनविरोधात गुन्हे दाखल

नाशिकमध्ये व्हॉटसऍपच्या तीन ग्रुपमधल्या आणखीन चार ऍडमिनविरोधात शहर पोलिसांनी सायबर ऍक्टप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. दिगंबर दीपक खरे, विशाल भिमा, सुभाष धात्रक व आदित्य कुंडलकर अशी संशयित ग्रुप ऍडमिनांची नावे आहेत. यात ९ व १० ऑक्टोबर रोजी संबंधित संशयितांनी हास्यकट्टा, स्वराज्य व कट्टर शिवसैनिक या ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट करून दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सायबर गुन्हे शाखेच्या तपासणीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर, सातपूर व अंबड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.