शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 24 मे 2016 (14:36 IST)

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रणजीत तांडे या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्या केली आहे. रविवार, सोमवारच्या दरम्यान रणजीतने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रणजीत हॉस्टेलमधील हजेरीला न आल्याने हा प्रकार उघडकीस आला. रणजीत मूळचा बारामतीचा असून तो पिंपरीच्या पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने आत्महत्या का केली याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.