शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (15:07 IST)

उत्सव काळात साईचरणी ३ कोटी ७५ लाखाचे दान भक्तांकडून अर्पण

शिर्डी साईबाबा पुण्यतिथी उत्सव काळात चार दिवसांमध्ये ३ कोटी ७५ लाखाचे दान भक्तांकडून साईचरणी अर्पण करण्यात आले आहे. यात ८६५ ग्रॅम सोने तर साडेतीन किलो चांदीचा आणि परकीय चलनाचाही समावेश आहे. यात साई संस्थानच्या दक्षिणा पेटीत १ कोटी ९३ लाख, देणगी काऊंटरवर ९३ लाख, ऑनलाईन डोनेशनद्वारे २६ लाख तसेच ७ लाखांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. यासोबत २३ लाखांचे ८६५ ग्रॅम सोन्याचे दागिने तर साडेतीन किलो चांदी साईचरणी अर्पण करण्यात आली. दसर्‍याच्या दिवशी वेंकचा अटुलरी या भाविकाने ७५० ग्रॅम वजनाचा २२ लाखांचा सोन्याचा मुकुट,  एका अज्ञात भाविकाने अडीच लाखांचा हिरेजडीत ब्रोच साईचरणी अर्पण केला.