शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 जून 2016 (10:35 IST)

एकनाथ खडसेंना क्लीनचिट

गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात एकनाथ खडसेंचा हात नसल्याचा निर्णय लोकायुक्त एम. एल. तहलिया यांनी दिला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली आहे.

लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीनं गजानन पाटलाला मंत्रालयाबाहेर रंगेहात अटक केली होती. या लाचखोरी प्रकरणी तक्रारदार रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली आहे.

लोकायुक्तांच्या या निर्णयामुळे एकनाथ खडसेंना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. अंबरनाथमधील जमीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात एकनाथ खडसेंचे कथित पीए गजानन पाटील यांनी 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप रमेश जाधव यांनी केला होता.