1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 25 जून 2016 (17:19 IST)

कोंबड्यांच्या झुंजी बंद करण्याचे आदेश

कोंबड्यांच्या झुंजी कायमच्या बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. कोंबड्यांच्या झुंजीत त्यांच्या पायाला छोटा चाकू अथवा धारदार हुक बांधले जातात. ज्यामुळे हे पक्षी घायाळ होतात, किंवा त्यांना कायमचे अंपगत्व येते; बऱ्याचदा त्यांना प्राणही गमवावे लागताे. याशिवाय या झुंजीवर जुगारही लावला जात असल्यामुळे त्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी जयसिंहा यांनी याचिकेद्वारे केली होती. पशुसंवर्धन कायद्यात अंतर्गत या झुंजींवर बंदी असली, तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे या झुंजी सुरू असल्याने एन. जी. जयसिंहा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.