1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: पुणे , मंगळवार, 1 जुलै 2014 (10:37 IST)

जुलैत पाऊस;हवामान खात्याचा अंदाज

जून संपला असू जुलैचा आज पहिला दिवस आहे. तरीदेखील  पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचे शेतकर्‍यांसह सगळे चिंता  व्यक्त करत आहे. देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरी  राज्यात तो अद्याप दाखल झालेला नाही. मात्र,अजून तीन दिवस  मान्सूनची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जुलैच्या ‍पहिल्या  आठवडयाअखेर राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज  भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपसंचालिका डॉ.मेघा गोखले यांनी  वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही.  चक्राकार वार्‍यांची निर्मिती होत आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर कमी  दाबाच्या क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेचा  दाब वाढून  किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा  तयार होण्याची चिन्हे  आहेत. ही हवामानस्थिती मान्सूनची आगेकूच र्होण्यास चालना देऊ  शकतात, असेही डॉ.गोखले यांनी सांगितले आहे.