शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाशिकमध्ये जनजीवन पूर्वपदावर, मात्र ८ गावांत संचारबंदी

तळेगाव बालिका अत्याचारप्रकरणामुळे तणावात असलेल्या नाशिक शहर परिसराचे जनजीवन  गुरुवारी पूर्वपदावर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये यामध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती आहे. याशिवाय शहरातील परिवहन महामंडळाची बससेवा नियमितपणे सुरु झाली आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, बागलाण, कसारा आणि नाशिकरोडसाठी चालविली जाणारी बस अजूनही बंद आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील ७ गावांमध्ये बुधवारी रात्रीपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात शेवगेदारणा, वाडीवर्हेे, गोंदे, विल्होळी, सांजेगाव, तळेगाव, अंजनेरी, तळवाडे या गावांचा समावेश आहे. शहरात शांतता  असून संवेदनशील परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणेने पूर्ण शहरात स्ट्राईकिंग फोर्स तैनात केले आहे. शहरात अफवा पसरवून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवा आणि मद्यविक्री बंद ठेवली आहेत. याशिवाय अफवा पसरवणारयांवर शहर आणि जिल्हा सायबर सेलची करडी नजर असून अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.