शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सिंधुदुर्ग , मंगळवार, 24 मे 2016 (14:33 IST)

पांडुरंग गावडे यांच्यावर अंत्यसंस्कार

कुपवाड्यात शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांच्यावर आंबोलीतल्या मुळवंदवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावडे यांचे पार्थिव आज सकाळी गोव्यातून आंबोली येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली त्यानंतर पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. गेल्या 15 वर्षांपासून गावडे देशाची सुरक्षा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

अंत्ययात्रेदरम्यान शहीद पांडुरंग गावडेंच्या परिवाराला योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करु असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं.