1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यासह सोलापूरमध्ये पावसाला सुरुवात

पुणे- पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला बुधवारी सांयकाळी सुरुवात झाली. सोलापुरात बुधवारी रात्री 8.30 र्पत 19 मि.मी. पाऊस झाला. 
 
दुपारनंतर आकाशात ढग जमा होऊ विजांचा कडकडाट सुरू झाला होता. पुणे शहरासह परिसरामध्ये सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. विविध इमारतींवर चिमुकल्यांसह नागरिक भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. गरम झालेल्या रस्त्यांवरून पाणी वाहू लागले आहे. वाहनचालक रस्त्याच्या कडेला उभे राहून पावसाचा आनंद घेत आहेत. कमाल तापमानात गेल्या काही दिवसात सातत्याने घट होत असल्याने राज्यातील उष्णतेची लाट ओसरली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.पूर्वमोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होत असल्याने राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.