1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 20 डिसेंबर 2014 (15:30 IST)

पेट्रोसाठी पैसे नसल्याने विमान थबकते तेव्हा....

दिल्लीत न्यायालयीन दाव्यासाठी ११ वाजता पोहोचायचे होते... पुण्यातून सकाळी ७ वाजताचे विमान होते.... पहाटे ५ वाजता उठून आवराआवरी करुन सबंधित वकिलांनी विमानतळ गाठले... स्पाइसजेटचे विमान साडेसहा वाजताच पट्टीवर आले... सात वाजले... विकिलांबरोबरच प्रवाशांची धांदल सुरु झाली... मात्र, प्रवाशांना पुढे सोडले नाही... चौकशी केल्यावर समजले की कंपनीकडे व्हाईट पेट्रोल भरण्यासाठी पैसेच नसल्याने विमान जागचे  हलणार नव्हते. तेव्हा प्रवाशांची भंबेरी उडाली... कुणी संताप व्यक्त केला तर कुणी डोक्याला हात लावून बसले... अखेर सकाळी सात वाजताची नियोजित विमानाने दुपारी उशीरा उड्डान केले. गेल्या तीन दिवसांपासून स्पाइस जेट विमान कंपनीच्या रद्द होणाºया सेवांमुळे विमान प्रवाशांना  गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पण, आता कंपनीकडून लवकरच ही गैरसोय दूर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.