शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (10:20 IST)

पोलीस अधिकाऱ्याची कार जाळली

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या  राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकांची टाटासुमो भरदिवसा जाळून टाकली घटना घडली आहे .  तीन लाख ८० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाहन जाळणार्‍याला अटक केली असून त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शेळके यांना वापरण्यासाठी एमएच १८ एफ १६२ क्रमांकाची टाटासुमो हे शासकीय वाहन देण्यात आलेले होते.  गाडी पार्क करून त्यानंतर चालक तेथून बाहेर कोठे तरी गेला. त्याचदरम्यान   ४० वर्षीय व्यक्ती पोलिस अधीक्षक कार्यालयात आला व त्याने तेथे कोणी नाही हे हेरुन सदर टाटासुमोवर ज्वलनशील पदार्थ टाकून सुमो पेटवून दिली. त्यानंतर सुमो जाळणारा तेथून पळाला.पोलिसांनी सुमो जाळून पळणार्‍याला लगेचच ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव मनिष पुरुषोत्तम भोरस्कर (वय ४०, रा.भिडेबाग, धुळे) असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मनिष भोरस्करला अटक केली असून त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनिषने गाडी का जाळली त्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.