शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (17:58 IST)

मोबाईल फोनचा स्फोट, तरुणाचा पाय भाजला

ठाण्याजवळ असलेल्या शहापूरमधील वासिंदमध्ये एका तरुणाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आहे. यामध्ये त्याचा पाय भाजला आहे. यात करण ठाकरे असे तरुणाचे नाव आहे. 
 
सदरचा मोबाईल कार्बन कंपनीचा फोन होता. करणने नेहमीप्रमाणे पँटच्या खिशात मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक स्फोट झाल्याने फोन फुटला आणि त्याच्या डाव्या पायाची मांडी भाजली.