Last Modified: दिल्ली , बुधवार, 11 मे 2016 (10:54 IST)
यूपीएससी ; योगेश कुंभेजकर महाराष्ट्रात पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगा परीक्षेत योगेश कुंभेजकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत दिल्लीतल्या टिना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. या परीक्षेला 1,078 विद्यार्थी बसले होते. यातील 499 विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील होते. तर 314 जण हे मागास वर्गीयांतून परीक्षेला बसले होते. 176 अनुसूचित जातीतून तर 89 अनुसूचित जमातीतून परीक्षेला बसले होते. या परीक्षेत जम्मू-काश्मीरमधला अथर आमीर उल साफी खान या दुसरा आला. जसमीत सिंग सिंधू तिसरी आली आहे.
आयोगानं 172 जणांची यादी आरक्षित केल्याची माहिती दिली आहे.