शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लघुशंकेसाठी गेला आणि जीव घालवून बसला

मुरबाड- माळशेज घटात एक तरुण रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून दगडाच्या खदानीत पडला. मात्र पडत असताना त्याने विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मूत्यू झाला. 
 
अजित जगदीश चौधरी असे तरुणाचे नाव असून तो मिरारोड परिसरात राहणारा होता. विकेंड असल्याने हॉट-डेस्टिनेशन असणाऱ्या मालशेज घाटात पर्यटक मोठ्या संख्येने मजा लुटण्यासाठी येत असतात. घाटाकडे जाताना मुरबाड शहरापासून पुढे घाटरस्त्याने जात असताना मडकेपाडा गावाशेजारी ग्रीन पार्क व्हिलेज जवळ मीरारोड परिसरातील 23 वर्षाचा अजित हा लघुशंकेसाठी रस्ताच्या कडेला गेला असता, त्या ठिकाणी सपाट असणार्‍या जागे शेजारी असलेली दगडाची खदान त्याला समजली नाही. पावसामुळे निसरड्या जागेवरून पाय घसरून त्याचा तोल गेला. मात्र खदानित पडताना तेथील विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्यातच त्याचा मृत्यू झाला.