1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (17:01 IST)

शाहीथाटात देवेंद्र यांचा शपथविधी सोहळा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांना दिल्या शुभेच्छा.
भाजपा सरकारचा शाही शपथविधी सोहळा संपन्न.  
शिवसेना नेते सुभाष देसाई यांना पराभूत करणा-या गोरेगावमधील आमदार विद्या ठाकूर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
दिलीप कांबळे यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

विक्रमगड येथील आमदार विष्णू सावरा यांनाही मंत्रिमंडळात स्थान, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
पंकजा गोपीनाथ मुंडे यांचाही मंत्रिमंडळात समावेश, कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ.
प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, मराठीतून घेतली शपथ.



राष्ट्रगीताने झाली शपथ विधीसोहळ्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी वानखेडे स्टेडियमवर दाखल, मोदी...मोदी या घोषणांनी स्टेडियम दणाणून सोडलें.
शपथविधी सोहळ्याच्या गर्दीमुळे पद्मजा फेणाणी आणि हर्षवर्धन पाटीलही ताटकळले.
पंकजा गोपीनाथ मुंडे यांचाही मंत्रिमंडळात समावेश, कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ.
प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही वानखेडे स्टेडियमवर दाखल.
गर्दीमुळे वानखेडे स्टेडियमचे गेट क्रमांक ३ बंद, नीलम गो-हे, दिवाकर रावते गर्दीमुळे स्टेडियमबाहेर ताटकळले.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीहून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना.
शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएतील घटकपक्षांचे नेते वानखेडे स्टेडियमवर उपस्थित.
सध्या वानखेडे स्टेडियमवर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार,छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी नेते शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचले.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना.
देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला राहणार उपस्थित.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली.