रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (14:51 IST)

सैराट आर्चीने सोडली शाळा

सपूर्ण महाराष्ट्राला आणि हिंदी सिनेमाला टक्कर देणाऱ्या सैराट सिनेमाने असे अनेक ऐतिहासिक विक्रम केले. त्यात प्रमुख भूमिका करत असलेल्या रिंकू राजगुरूने  लोकांनी अक्षरश वेद लावले आहे. मात्र रिंकू यावर्षी १० च्या वर्गात शिकत होती.
 
रिंकू मंजेच आर्चीची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली आहे की तिला आता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांशिवाय जाणंही शक्य नाही होत. तर अशी परिस्थिती  तिच्या शाळेतही आहे. त्यामुळे रिंकु राजगुरुने शाळेला जय महाराष्ट्र करण्याचा म्हणजेच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या वडिलांनी ३० जूनला रिंकुच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यात आल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
 
काही दिवसांपूर्वी रिंकू शाळेत रुजू झाली होती. पण तिची क्रेझ मात्र काही कमी झाली नाही. ती शिक्षण सोडणार नाहीए. पण शाळेत गेल्यावर मुलांची तिच्याच भोवती जास्त गर्दी वाढते. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिंकूच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा १७ नंबरच फॉर्म भरला असल्याची माहिती मिळाली आहे. तर तिच्याकडे अनेक कामे आहेत. सोबतच अनेक सार्वजनिक ठिकाणी तिला बोलावणे येते,त्यामुळे तिला सर्व गोष्टी पाहून शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.