रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जुलै 2023 (20:46 IST)

27 reports of dengue positive डेंग्यूचे २७ अहवाल पॉझिटीव्ह! डासांची उत्पत्ती वाढली..

dengue
27 reports of dengue positive डोळे आणि तापाची साथ सुरू असताना दुसरीकडे डेंग्यूचा रुग्णांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज ३० हून अधिक डेंगू सदृश्य रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यातील २१६ रुग्णांपैकी २७ रुग्णांची अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
शहरात डेंग्यूचा प्रकोप अद्याप कायम आहे. मात्र सुदैवाने एकही मृत्यू डेंगीमुळे झालेला नाही. जानेवारी महिन्यात १२५ संशयित आढळले होते, तर १७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फेब्रुवारी महिन्यात १२२ संशयित आढळले होते. खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले असून, प्लेटलेट्स कमी झाल्याने रक्तपेढ्यांमध्येदेखील रक्ताची मागणी वाढली आहे. महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जुलै महिन्यात २१६ रुग्ण आढळून आले आहेत.
 
पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्यानं डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय. खाजगी रुग्णालयात डेंग्यूसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात असली तरी ही साईड टेस्ट असल्याने रुग्णाला डेंग्यूसदृश आजाराची लागण असल्याच समजल जात. यातील एलायाझा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यूची लागण झाल्याची नोंद होत आहे.