मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , सोमवार, 24 जुलै 2023 (20:56 IST)

The True Murder of Tarzan सच्चा टारझनचा खून; अनैतिक संबंधातून खून झाल्याची प्राथमिक माहिती; एकजण ताब्यात

murder
The True Murder of Tarzan गुंड दादया सावंत याच्या खूनप्रकरणांतील प्रमुख संशयित आरोपी असणाऱ्या गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सचिन टारझन याच्यावर सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कुपवाड येथील अहिल्यानगरमधील एका घरात डोक्यात कोयता घालून खुनी हल्ला केला. सचिन टारझनता काही समजण्याच्या आधीच त्यांने त्याच्यावर सात ते आठ वार केले यामध्ये टारझन हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
 
गुंड सच्चा टारझन हा सध्या एका खूनप्रकरणांत जामीनावर आहे. तो पहाटे च्यासुमारास अहिल्यानगर येथे एका घरात आला होता. याची माहिती इल्लेखोराला मिळाल्यानंतर हल्लेखोर याठिकाणी आला आणि त्यांने सचिन टारझनला काही समजण्याच्या आधीच त्याच्या डोक्यात कोयता घातला. त्यानंतर त्यानं सात ते आठ वार त्याच्यावर केला आणि तो पळून गेला दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ सच्चा टारझनला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच तो मयत झाला कुपवाड पोलीसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहे. वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.