लक्ष्मीपूजनादिवशीच 3 शेतकऱ्यांची आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्रपुरात तीन शेतकर्यांनी आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथे 25 वर्षीय तरुण शेतकरी वैभव अरुण फरकडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चेक पिपरी येथील 34 वर्षीय शेतकरी महेश भास्कर मारकवार यांनी विषारी औषध प्राशन करत ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. तरुण शेतकर्यांानी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिसर्यान एका घटनेत चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंड पिपरी तालुक्यातील किरमीरी येथील बंडू रामटेक यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मृत रामटेके यांच्या सोयाबीनच्या ढिगाला आग लागल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन शेतकर्यांआनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.