1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (19:03 IST)

शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

दोन वर्षापूर्वी दिपाली कदम यांची पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वाल्मीक अहिरे यांच्याशी ओळख झाली. अहिरे हा वारंवार दीपालीस ओळखीचा गैरफायदा घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. दिपालीचे नुकतेच लग्न ठरले होते. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी दिपाली चा साखरपुडा झाला होता. येत्या 16 नोव्हेंबर रोजी दीपाली व मयूर कांबळे यांचा शुभविवाह ठरला होता. साखरपुडा व लग्नामुळे दिपाली सध्या तिच्या मूळ गाव देलवडी ता. दौंड येथे होती. 
 
लग्न जमल्याची माहिती अहिरे यांना समजताच त्यांनी नवरदेव मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे(राहणार भोसरी पुणे) यांना फोन करून दिपाली संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सदर बाब मयूर कांबळे यांचे वडील दत्तात्रय कांबळे यांनी दिपालीचे वडील बापुराव कदम यांच्या कानावर घातली. वाल्मीक आहिरे याने मंगळवार दिनांक दोन रोजी रात्रीच्या सुमारास दिपाली चा भाऊ रोहित फोन करून तुम्ही तिचे इतर कोणाशी लग्न करू नका नाहीतर तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी दिली.
 
मंगळवारी रात्री सर्व कुटुंबीयांनी दिपाली हिस समजावून सांगितले. बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन दीपालीने आत्महत्या केली. यासंदर्भात दिपालीचा भाऊ रोहित कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहे. त्यानंतर बुधवारी ४.०० सुमारास दीपालीवरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.