1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (08:22 IST)

राधानगरी धरणात 4.55 टीएमसी पाणीसाठा; 700 क्यूसेकने विसर्ग सुरू; पावसाचा जोर कायम

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व दाजीपूर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पाणीसाठा 4553.18 द ल घ फूट( 4.55 )टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे, व पाणी पातळी 323.15 फूट इतकी आहे ,या वर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती, मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे,
 
 दिवसभरात 67 मी मी इतका पाऊस नोंदला आहे ,तर आजतागायत 1244 मी मी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, सध्या खाजगी जलविद्युत केंद्रातुन 700 क्यूसेकने विसर्ग सुरू केल्याने भोगावती नदी पात्रात वाढ झाली आहे, त्यामुळे नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे,
 
Edited By - Ratnadeep ranshoor