शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (12:47 IST)

साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक

शिर्डीतील साईबाबा संस्थानची नवीन कार्यकारिणी राज्यसरकारने जाहीर केल्या पासून दररोजच्या नवीन घडामोडी घडत आहे.या संस्थेचे नूतन अध्यक्ष आमदार काळे हे कोरोनाबाधित झाल्यांनतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नवीन कार्यकारिणीचे अधिकार गोठविले.या घडामोडी नंतर काल रात्री साईबाबा संस्थेचे प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या वर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनल ला पुरवून संस्थानाची बदनामी करण्याचा आरोप आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप,सह इतर पाच जणांना अटक केली आहे.त्यांचा वर संस्थानातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून चुकीचा बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे.संस्थानाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
 
प्रकरण काय आहे 
शिर्डीच्यासाईबाबाच्या मंदिरात 31 ऑगस्ट 2011 ला साईबाबा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि प्रधान जिल्हा न्यायधीश व समितीचे सदस्य असलेले अहमदनगरचे धर्मदाय आयुक्त उपस्थित असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती.आणि हे फुटेज सोशल मीडिया चॅनल वर दाखवून बदनामी कारक मजकूर दाखविण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तर त्यामध्ये हे फुटेज बाहेर काढण्यात हे सहा जण दोषी म्हणून आढळले.या फुटेजमुळे आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.