सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (08:02 IST)

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 7 मुद्दे

मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. नीरज चोपडाने सर्व देशाची मान उंचावली आहे असं ठाकरे म्हणाले.
 
स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधीच तुम्हाला विनंती करतो.आपण निश्चय करायला हवा.जसं दीडशे वर्षांची गुलामगिरी आपण उलथावून टाकली,तशी कोरोनाची टांगली तलवार नष्ट करायला हवी,असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
1. पुराबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
पावसाची सुरुवात वादळाने झाली. हानी झालीच. अचानक पूर आला, ते विचित्र होतं. काही महिन्यांचा पाऊस तासात कोसळला. अंदाजच नाही आला का-अंदाज आला.अतिवृष्टी किती होईल याचं परिणाम जगात कोणी मोजू शकत असेल.नद्या ओसंडून वाहू लागल्या.धरण्यातल्या पाण्याचा विसर्ग करायला लागला. चिपळूण, महाडमध्ये पाणी भरलं. सांगली, कोल्हापूरमध्येही पाणी भरलं.अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतरही प्रशासनाने साडेचारलाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं.दरडी कोसळल्या त्यात रस्ते खचले.घाट खचले.दरडी कोसळून गावंच्या गावं चिखलमय झाली आहेत.आपले बांधव दरडीखाली गाडले गेले.जीवितहानी फार झाली.
 
दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढू लागलंय. सिक्कीमचे मुख्यमंत्री हेच म्हणाले, तिथेही दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढू लागलंय. नवीन संकट आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळू लागले आहेत. यामुळे पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
 
नैसर्गिक संकटाबाबत कायमस्वरुपी विचार करायचा आहे. मुख्यमंत्री घटनास्थळी गेल्यानंतर पॅकेजची घोषणा करतात. मी तसं केलं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं होतं. मी परतलो, मंत्रिमंडळाची बैठक झाली.पालकमंत्री नागरिकांना मदत करत आहेत. तात्काळ आणि कायमस्वरुपी साडेअकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. वाटप सुरू झालं आहे. दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
2. 'आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा केंद्राने शिथिल करावी'
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. इंपीरियल डेटाची मागणी केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नाही, केंद्राला आहे.गरीब, वंचितांना न्याय हक्क मिळवून द्या किंवा पन्नास टक्क्यांची अट शिथिल करून राज्याला अधिकार द्यावा. आरक्षणाचा अधिकार राज्याला परत द्यावा यासंदर्भात निर्णय होईल. अट शिथिल होत नाही तोवर वाढीव आरक्षण देता येणार नाही.माननीय पंतप्रधान आरक्षणाची अट ते काढतील अशी आशा आहे.
 
3. जर तिसरी लाट आलीच तर काय करायचं?
कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली. गेल्या वर्षी सणांच्या नंतर दोन लाटा आपण अनुभवल्या. या काळात एक गोष्ट आपण शिकलो आहोत. कोव्हिड नियमावली आपल्याला पाळावीच लागेल.लशीचा साठा आणि पुरवठा वाढतो आहे. तसतसा लसीकरणाचा वेग वाढतो आहे. जोपर्यंत लसीकरण ठराविक टप्प्यापर्यंत पूर्ण होत नाही तोवर काही गोष्टींचं पालन करावंच लागेल.तिसरी लाट येऊच नये, पण दुर्देवाने आली तर आरोग्य सुविधांमध्ये वाढ करत आहोत. टेस्टिंग लॅब दोन होत्या, त्या आता सहाशेच्या वर आहेत.आयसोलेशन बेड हजारात होते, आता साडेचार लाखांपर्यंत उभे केले आहेत. ऑक्सिजन बेड एक लाख दहा हजार आहेत.
 
4. मुंबईत जिनोम सिक्वेन्सिग लॅब
डेल्टा व्हेरिएंटने जग व्यापलं आहे. विषाणूचे बदललेले प्रकार वेगाने प्रसार होतात. मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग लॅब सुरू केली आहे. देशातली पहिली महानगरपालिका नागरिकांसाठी अशी सुविधा दिली आहे.
राज्यात जिथे व्हायरसचं स्वरुप बदललं आहे का असं वाटेल तिथून नमुने घेऊन या लॅबमध्ये तपासल्या जातील काळजी घेण्यासारखी ठिकाणं- सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड हे जिल्हे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
5. लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक
लशीचे दोन डोस घेतलेल्यांची माहिती गोळा करावी लागेल. दोन लशीचे डोस घेऊन 15 दिवस झालेल्या लोकांची माहिती जमा करावी लागेल.टास्क फोर्स निर्णय घेणार, 8-10 दिवसांचा कालावधी लागेल
अडचण सगळ्यांनाच आहे. रेस्टॉरंट संघटनेचे पदाधिकारी मला भेटले. टास्कफोर्सशी चर्चा करून रेस्टॉरंट, धार्मिकस्थळं एकेक करून खुली होतील. यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेलय
पण घाई करू नका. कोरोनाला आटोक्यात येतो आहे, त्याचा प्रसार वाढू देऊ नका. कोव्हिड अजून गेलेला नाही.रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, ऑक्सिजन बेडची संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात येईल.
 
6. लोकल सेवा सुरू होणार
दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मुंबईत लोकल प्रवास सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.मुंबईत लोकल प्रवास सुरू करत आहोत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून लोकलचा प्रवास लशीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस झाले आहेत त्यांना प्रवासाची मुभा आहे
 
लशीकरण झालेल्या नागरिकांची माहिती अॅपवर टाकली आहे. येत्या काही दिवसात अॅप लॉन्च करण्यात येईल.ऑफलाईन सिस्टमनेही पास देण्यात येईल. 19 लाख नागरिक असे आहेत ज्यांचे लशीचे दोन डोस झाले आहेत आणि लसीकरण होऊन 14 दिवस झाले आहेत. हे नागरिक लोकल प्रवासासाठी पात्र असतील.15 तारखेपर्यंत अॅप, महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पास कलेक्ट करावेत.
 
7. कोरोनामुक्त होणं हा माझा अधिकार आहे
सणासुदीच्या काळात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.रेस्टॉरंट, धार्मिकस्थळं यासंदर्भात निर्णय टास्कफोर्सच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल.
स्वातंत्र्यदिनी शपथ घेऊया की कोरोनामुक्त होऊया.
 
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणाले होते तसं कोरोनामुक्त होणं हा माझा अधिकार आहे अशी प्रतिज्ञा करा.