गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (13:54 IST)

लग्नात 700 जणांना विषबाधा

food of indore
phot0: symbolic
औरंगाबाद- एक धक्कादायक प्रकारात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात 700 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला असून येथे पाहुण्यांचे जेवण झाल्यावर काही वेळानंतरच त्यांना उलट्या व मळमळीचा त्रास सुरु झाला. अशात त्यांना परिसरातील एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेवणातील विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.
 
4 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह पार पडल्यानंतर रात्री पाहुण्यांना मेजवानी देण्यात आली होती. जेवल्यांनतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळी चा त्रास होऊ लागला.